अंकुश जाधव सन-२०२१ मध्ये विविध संस्थांकडून सलग तीन वेळा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत
सिटी बेल | रोहा |
शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सतीश मोहन पाटील यांच्या ” न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली ” विद्यालयात गेली १६ वर्षे कार्यरत असणारे निवी गावचे सुपुत्र अंकुश जाधव यांना विविध संस्थांकडून तीन वेळा ” आदर्श शिक्षक पुरस्काराने ” सन्मानित करण्यात आले आहे .
अंकुश जाधव हे एक दिव्यांग शिक्षक असून अत्यंत बुद्धिमान , प्रामाणिक, कष्टाळू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, संस्कृती कार्य खरोखरच उल्लेखनीय, प्रशन्सनीय आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन “श्री साई प्रतिष्ठान पुणे “, राष्ट्रीय काव्यांगण लेखणीचे साहित्य मंच तथा सामाजिक संघटना, आणि आज नुकताच राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था आणि श्री राजपूत करणी सेना जळगाव आदी सामाजिक संस्थांनी आदर्श शिक्षक पुरस्कारानी गौरवीले आहे.
राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था आणि श्री राजपूत करणी सेना आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात साहित्यिक अ . फ. भालेराव, श्री विलाससिह पाटील, बी . एच .खंडाळकर, सौ मीनाक्षी चव्हाण, श्री सुरेश वाघ, गणेश अमृतकर , सुमित पाटील, संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ, श्री, ज्ञानेश्वर वाघ, सागर पाटील व पुरस्कार्थी आदर्श शिक्षक गण उपस्थित होते.
अंकुश जाधव यांच्या नावावर आजपर्यंत आदर्श शिक्षक, वृक्षमित्र, काव्यभूषण, ज्ञानभूषण, समाजरत्न, शिक्षकरत्न, कविभूषण, समाजभूषण ,उत्कृष्ट निवेदक असे अनेक पुरस्कार आहेत. याची विश्वासहर्ता तपासायची असल्यास त्यांचे फेसबुक अकाऊंट फॉलो करा. आणि आज राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था आणि श्री राजपूत करणी सेना यांनी दिलेला आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांच्या गुणगौरवात मानाचा शिरपेच चढवतो.
ते त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन शैलीने विद्यार्थीवर्गात प्रिय शिक्षक आहेत.
आज त्यांच्यावर सर्व स्थरातून, सहकारी अध्यापक वृंद, त्यांचे लाडके विद्यार्थी, पालक, मित्र परिवार, निवी ग्रामस्थ, नातेवाईक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment