सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । अमोल नाईक ।
कोरोना लॉकडाऊन आणि निसर्ग चक्रीवादळा मुळे कोकणावर फार मोठे संकट आले त्या मुळे आपल्या भूमिपुत्रांवर उपासमारीची वेळ आली. सरकारकडून येणारी मदत आजून देखील गोरगरीबांपर्यंत पोहचलेली नाही. त्या साठी अनेक सेवाभावी संस्था मदतीचा हात पुढे करत आहेत, यातच रायगड जिल्ह्यात खेडोपाड्यात सीएफटीआय ट्रस्टच्या माध्यमातून लाखो रुपयांची आर्थिक आणि अन्नधान्य स्वरुपात आजवर मदत करण्यात आली.
अलिबाग तालुक्यातील सुडकोली ग्रामपंचायती मधील सुडकोली, नवखार, तळवली, भागवाडी, भोनंग, तळवली आदिवासी वाडी, सुडकोली सुवर्णा आदिवासी वाडी यांना २५ लाख रुपयांची वस्तू स्वरुपात जवळपास १२०० कुटुंबांना मदत केली यामध्ये पत्रे. अन्नधान्य, सौर दिवे आदीचे वाटप करण्यात आले.
यावेळी सीएफटीआय ट्रस्टच्या प्रमुख, शेकापच्या महिला आघाडी प्रमुख, नगरसेविका चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील, सुडकोली ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रिती जयवंत तांबटकर, माजी सरपंच जयवंत तांबटकर, उपसरपंच अनिल शेळके, ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील, रश्मी पाटील, नवनीत पाटील, अनंत पाटील, आदिवासी बांधव आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे सर्वच घटक बाधीत झाले आहेत. अर्थचक्रच थांबलेले आहे.
लॉकडाऊन आणि आता चक्रीवादळाच्या संकटात शेतकरी कामगार पक्षाचे सर्वच कार्यकर्ते झोकून देऊन काम करीत आहेत. चित्रलेखा पाटील यांच्या सीएफटीआय ट्रस्टच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर गरजूंना मदत केली जात आहे. शेकापच्या माध्यमातून घरोघरी जाऊन त्यांना मदत करण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न कौतुकास्पदच आहे.
Be First to Comment