Press "Enter" to skip to content

मासिक संक्रमणाबाबत मार्गदर्शन

प्राँक्टर अँड गँम्बल यांच्या वतीने सँनिटायझर नँपकिनचे वाटप

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

विविध उत्पादनात नावाजलेल्या प्राँक्टर अँड गँम्बल अंधेरी-मुंबई यांच्या वतीने वयात आलेल्या शालेय मुलींसाठी सँनिटायझर नँपकिनचे वाटप करून मासिक
संक्रमण याबाबत सुयोग्य मार्गदर्शन करण्यात आले.

गेल्या काही वर्षापासून प्राँक्टर अँड गँम्बल अंधेरी-मुंबई यांच्या वतीने वयात आलेल्या शालेय मुलींसाठी सँनिटायझर नँपकिनचे वाटप करून मासिक संक्रमण याबाबत सुयोग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनीना अशाप्रकारचे सँनेटायझर नँपकिनचे वाटप करण्यात येत आहे. तर प्राँक्टर अँड गँम्बल अंधेरी-मुंबई यांच्या वतीने रोहे तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या संस्थेच्या श्री.रा.ग.पोटफोडे(मास्तर) विद्या.खांब, श्रमिक विद्यालय चिल्हे व न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी-राजखलाटी या तीन विद्यालयात सदरचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी प्राँक्टर अँड गँम्बल यांच्या वतीने
हर्षांगी म्हात्रे (पाटील) व मुख्याध्यापक दीपक जगताप, सुरेश जंगम,अनिल खांडेकर व अन्य शिक्षकवर्ग उपस्थित होते.

यावेळी हर्षांगी म्हात्रे(पाटील) यांनी
विद्यार्थ्यांनीना मासिक पाळी व आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. तर संस्थेचे वतीने केलेल्या सहकार्याबद्दल प्राँक्टर अँड गँम्बल यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.