शैक्षणिक साहित्याचे वाटप करून लहानग्याचा वाढदिवस साजरा
सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील मुठवली खु.येथील युवा सामाजिक कार्यकर्ते महेश तुपकर यांनी आपल्या चिरंजिवाचा ५ वा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते महेश तुपकर हे दरवर्षी आपल्या मुलाचा वाढदिवस मालसई येथील आदिवासी वाडीवर जाऊन तिथल्या मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून तसेच त्यांच्या समवेत केक कापून वाढदिवस साजरा करीत आले आहेत.तर त्यांनी गत चार वर्षाची परंपरा राखत याही वर्षी मोठ्या उत्साहात व शैक्षणिक साहित्य वाटप करूध आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष जयवंत मुंडे,सरपंच हेमंत मालुसरे, उपसरपंच योगेश शिंदे, सदस्य मारुती तुपकर,युवा कार्यकर्ते महेश तुपकर,मंगेश देवकर,विनायक सकपाळ, धनराज शिंदे, रोहिदास तुपकर, शिवतेज शिंदे,नागेश खंडागळे,ऋषिकेश खंडागळे,सौरभ ठाकूर, विनायक सावंत,करण शिंदे,मयुरेश तुपकर, परेश मालुसरे,चेतन मालुसरे, शैलेश मोहिते, तेलंगे,आदी युवक उपस्थित होते.दरम्यान सामाजिक कार्यकर्ते महेश तुपकर यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.








Be First to Comment