Press "Enter" to skip to content

प्रत्येकी 2 हजार रुपये मानधन वाटप

आमदार महेंद्र थोरवे यांच्या कडून आशा वर्कर,आरोग्य सेविका यांना मानधन : 203 जणींना मानधन वाटप

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून व सहकार्याने तालुक्यातील आशा वर्कर, आरोग्य सेविका यांना 2 हजार रुपये मानधन वाटप करण्यात आले.

मागील दोन वर्षांपासून देशावर व महाराष्ट्रावर कोरोनाचे महाभयंकर संकट आहे. अश्या परिस्थितीत प्रामाणिकपणे लोकहिताचे व सामाजिक सेवेचे काम आशा वर्कर, आरोग्य सेविका काम करत आहेत.आशा वर्कर व आरोग्य सेविका माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत काम करत असून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक कुटुंबियांची सेवा करत आहेत. अश्या आशा वर्करांचा सन्मान करणे गरजेचे असून त्याना सन्मान पूर्वक 2 हजार रुपये मानधन आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवास स्थानी देण्यात आले.

सद्याच्या आरोग्य सेवेतील आशा वर्कर व आरोग्य सेविका हे महत्वाचे घटक आहेत. परंतु सद्य परिस्थितीत शासनाकडून मिळणारे मानधन हे त्यांच्या सेवेनुसार अत्यंत तुटपुंजे आहे. या कारणास्तव शासनाकडून मिळणाऱ्या मानधनासोबत लोकप्रतिनिधी या नात्याने मदत केली पाहिजे या उदात्त हेतूने आज शिवतीर्थ या ठिकाणी जवळपास 203 आशा वर्कर व आरोग्य सेविकांना मानधनाचे वाटप करण्यात आले. व आत्ता पर्यंत केलेल्या सेवेकरिता आशा वर्कर व आरोग्य सेविका यांचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.