Press "Enter" to skip to content

कामोठ्यात आधार कार्ड नोंदणी शिबीर

सूरदास गोवारी यांच्या प्रयत्नातून कामोठ्यात मोफत आधार कार्ड नोंदणी शिबीर सुरु ; लाभला मोठा प्रतिसाद

सिटी बेल | कामोठे | प्रतिनिधी |

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामोठे शहराच्या वतीने पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ,महाराष्ट प्रदेश सचिव सूरदास गोवारी यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी कामोठे शहराच्या वतीने २२ व २३ ऑक्टोबर २०२१ रोजी ह.भ. प दामाजी गणपत गोवारी विद्यालय कामोठे येथे मोफत आधार कार्ड नाव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराला आज उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आतापर्यंत 160 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड , नावातील दुरुस्ती ,पत्ता दुरुस्ती ,जन्म तारीख दुरुस्ती ,मोबाइलला नंबर लिंक करणे ,बायो मेट्रिक अपडेट करणे या सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या शिबिराच्या नोंदणी व माहितीकरिता , कामोठे शहर कार्याध्यक्ष किशोर मुंडे संपर्क क्रमांक ८७७९८६४१४०, पदवीधर सेल कामोठे शहर कार्याध्यक्ष सामीध फदाले ८७९६९४३४७७, कामोठे शहर उपाध्यक्ष अनंत वारे ९९८७५५६६३३, पदवीधर सेल पनवेल जिल्हा अध्यक्ष स्वप्नील काटकर ८७९६९४३४७७, पनवेल जिल्हा सरचिटणीस नागेश पवार ८१०८००७१७३ , कामोठे शहर उपाध्यक्ष महेंद्र पाटील ९५९४६८९८९२ यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.