Press "Enter" to skip to content

पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार ; जिल्हा पोलीस अधिक्षक यांची शाबासकीची थाप

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायत हद्दीतील सावेळे गावात असलेल्या म्हशींच्या तबेल्यावर काम करणाऱ्या वयोवृद्ध कामगाराचा खून झाला होता. या घटनेत तबेल्याच्या मालकालाही मारण्यात आले होते. फिर्यादीच आरोपी असल्याचे पोलीस तपासात निपन्न केले व आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या, कर्जत पोलिसांनी 3 दिवसांत या खुनाचा छडा लावला होता, गुन्ह्यातील उत्कृष्ट तपास, कामगिरी बाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी कर्जत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा सत्कार केला आहे, व त्यांना शाबासकीची थाप दिली आहे.

पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना प्रमाणपत्र देवून सत्कार करताना पोलीस अधिक्षक अशोक दुधे

कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं 365/2021 भा.द.वि कलम 302,307,34 या संवेदनशील खुनाचा गुन्हा उघडकीस आणले या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बबन आल्हाट, पोलीस हवालदार संदेश सानप, पोलीस हवालदार स्वप्नील येरुणकर, पोलीस नाईक शैलेश कदम यांचा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार केला.याप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, निलेश तांबे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.