आमदार बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप
सिटी बेल| खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
कोकण शिक्षक मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळाराम पाटील यांच्या वैयक्तिक स्थानिक आमदार निधीतून शाळापयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप रोहा येथील कोएसो मेहेंदळे हायस्कूल मध्ये तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांना करण्यात आले.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते व रोहा तालुका शाळा निरीक्षक, आमदार बाळाराम पाटील यांचे विश्वासू, पनवेल तालुका कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती, संचालक मोहन कडू उपस्थितीत सदर साहित्याचे वाटप त्यांच्याच हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी हे साहित्य वाटप करण्यासाठी शेकाप नेते मोहन कडू,मेहेंदळे हायस्कूल प्राचार्य रमेश मोसे, शेकाप नेते प्रकाश नाईक, विरजोली हायस्कूल मुख्याध्यापक विनय मार्गे, चिल्हे हायस्कूल मुख्याध्यापक दिपक जगताप,नारायण पानसरे, पर्यवेक्षक टि.एल.म्हात्रे, किशोर पाटील, गणेश लांगी, सुनिल थिटे,विशाल सोनकर,अमोल पाटील इत्यादी शिक्षक वर्ग उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना संचालक मोहन कडू यांनी आमदार बाळाराम पाटील यांनी आतापर्यंत स्थानिक विकास निधी अंतर्गत कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शालापयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे, त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील एकूण १५५ शाळांमध्ये कम्प्युटर्स त्याचबरोबर एकूण ३२० शाळांमध्ये प्रयोगशाळा साहित्याचे वाटप केले आहे .सन २०२१ वर्षातील निधीतून रोहा येथील मेहेंदळे हायस्कूल येथे तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांना वाटप करण्यात आलेल्या साहित्यामध्ये ब्लॅकबोर्ड इन्स्ट्रुमेशन,भूमितीसंच,चार्ट, ई-चार्ट इत्यादी प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले.








Be First to Comment