पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत काॅंग्रेस पक्ष ताकदीने लढणार — प्रवीण पाटील
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
मागच्या पडत्या काळात सुध्दा पेण मध्ये आपण काॅग्रेस पक्ष जिवंत ठेवला असून पक्षाची विचारधारा शहरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सातत्याने पोहचविण्याचे काम करीत आलो आहोत त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ राहणा-यांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत असूूून जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना त्यांच्या आदेशानुसार येणाऱ्या पेण नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकतीने लढणार असल्याचे प्रतिपादन पेण शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले आहे.
काॅग्रेसच्या रायगड जिल्ह्यातील कार्यकारणीची सभा नुकतीच घेण्यात आली होती.या विस्तारित कार्यकारणी सभेला महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप, हनुमंत जगताप, प्रदेश चिटणीस ॲड. प्रवीण ठाकूर, सरचिटणीस नंदा म्हात्रे, चंद्रकांत पाटील, महिला जिल्हाध्यक्षा श्रद्धा ठाकूर, जे.टी.पाटील, जेष्ठ नेते डॉ.भक्तीकुमार दवे, युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे आदिंसह हजारों कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पेण शहरासह तालुक्यात काॅग्रेस पक्ष वाढविण्यासाठी प्रवीण पाटील आणि अशोक मोकल यांचे योगदान महत्वाचे असल्याने त्यांचा पक्षाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.








Be First to Comment