Press "Enter" to skip to content

तृतीयपंथियांच्या समस्यांबाबत बैठक

तृतीयपंथियांच्या समस्या निवारणाबाबत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार निवारण बैठक संपन्न

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

तृतीयपंथियांच्या समस्या निवारणाबाबत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार निवारण बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी जय मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन गुंजकर, पोलीस निरीक्षक कोल्हे, सहाय्यक संचालक, रोजगार व स्वयंरोजगार पवार, तसेच सर्व नगरपालिका, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या वाघमारे, लोकपरिषद संस्थेचे पदाधिकारी तसेच पत्रकार अशोक गायकवाड, आरजू फाऊंडेशनच्या सुश्री मानसी लक्ष्मी आदि उपस्थित होते.

या बैठकीत तृतीयपंथियांच्या तक्रारींचे जलद गतीने प्रभावी नियंत्रण व निवारण करणे महत्त्वाचे असून तसेच त्यांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी, आधार कार्ड, रेशन कार्ड, लसीकरण अन्य आरोग्य सुविधा मिळण्याच्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका उपायुक्त, सर्व नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांमार्फत जिल्ह्यातील तृतीयपंथियांची इत्यंभूत माहिती संकलित करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

तृतीयपंथियांच्या तक्रारींचे जलद गतीने प्रभावी नियंत्रण व निवारण करणे, प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करणे, आवश्यकतेनुसार विभागीय तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळास शिफारस करणे, तृतीयपंथियांना भेडसावणाऱ्या अडचणींचा/समस्यांचा/तक्रारींचा सखोल अभ्यास करणे व योग्य त्या उपाययोजना शासनास सुचविणे, याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सह अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-2, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, सहाय्यक संचालक, रोजगार व स्वयंरोजगार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेली सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्ती, तृतीयपंथियांसाठी काम करणाऱ्या नामवंत संस्थांमधील दोन तृतीयपंथिय व्यक्ती हे या समितीचे सदस्य असून समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.