Press "Enter" to skip to content

बळीराजा चिंताग्रस्त

भात कापणीला मजुरांचा अभाव ; ढगाळ वातावरणामुळे बळीराजा चिंताग्रस्त

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

परतीच्या पावसाची दहशद आजही बळीराजाला साठी संकट निर्माण करीत असले,तरी सुद्धा बळीराजा भात कापणी करण्यास व्यस्त झाला आहे.मात्र शेतमजुरांच्या कमतरते मुळे आजही शेतीची कामे खोळंबली असल्याचे तालुक्याच्या ठीकाणी पहावयास मिळत आहे.त्यातच वातावरणात उष्णताचे प्रमाण वाढत असल्यामुळे पेंढ्या पासून भाताचे दाने अलग होत असल्यामुळे या वर्षी पिक उत्तम आले असुन हातात हवे तेवढे धान्य मिळणार नाही काय ? अशी स्थिती बळीराजाची निर्माण झाली आहे.

सकाळ संध्याकाळी तयार होणारे ढगाळ वातावरण बळीराजाची चिंता वाढवित आहे.ही परिस्थितीत शेतकर्‍यांनी निसर्गाच्या लहरीपणावर मात करून भातपीकांना जोमाने वाढवून शेतजमीन फुलवुन धान्य निर्माण करीत आहे.परंतू परंपरागत कामे करणारे शेतमजूर अनेक भागातून येणारे मजूरांवर भातपीकांची कापणी ही प्रामुख्याने त्यांच्यावर अवलंबून असते. परंतु स्थानिक शेतमजूरांची दिवसेंदिवस कमी होत असलेली संख्या तसेच दुर्गम भागातूनही मजूर पुरेशा संख्येने तालुक्यात येत नसल्याने शेतमजूरांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.

दुर्गम भागातून येणारे मजूर हे दिवाळीपूर्वी परतीच्या प्रवासाला लागत असल्याने आता जे उपलब्ध होतील त्यांची मनधरणी करून लवकरात लवकर भातकापणी आटोपून घेण्याच्या प्रयत्नात शेतकरीवर्ग आहेत. दिवसभरातील कडक उन्हामुळे शेतमजुर हैराण होत असल्यामुळे या भात कापणीला पाठ फिरवित आहे.त्यातच भातामधील तांदळाचा दाणा टणक बनून दाणा तुटण्याची शक्यता अधिक असल्याने ठराविक वेळेत भातकापणी झाली नाही तर शेतकर्‍यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. मजुरांची हवी तेवढी अवश्यकता नसल्याने घरच्या घरी भात जोडणी सुरु झाली आहे.

पावसाचा अंदाज घेऊन बरेच शेतकरी मोठे प्लॅस्टिक अंथरून लाकूड, अगर दगडावर भात आपटून झोडणी करून भात सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवत आहेत. यंदा पावसाची ओढ, भातपिकावरील रोग यामुळे पिकांची उगवणी लांबणीवर पडली असली तरी परतीच्या पावसाने थोडीफार विश्रांती ही बळीराजा साठी मोठी आनंदाची परर्वणीच वाटत असते.मात्र असे असले तरी,सुद्धा रणरणत्या उन्हाची पर्वा न करता शेतात तयार झालेले धान्य घरी आणण्याची लगबग सुरु हे मात्र निश्चित.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.