महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन
सिटी बेल | गोवे कोलाड | विश्वास निकम |
महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्निशियन अँड आर्टिस्ट युनियनच्या वतीने “सन्मान नारी शक्तीचा” २०२1 आणि शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील समाजभूषण पुरस्कार २०२१ हा पुरस्कार सोहळा मुंबई येथे धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे.
या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन केले असून याकरिता सामाजिक, कला, क्रीडा, वैद्यकीय (डॉक्टर), वकील, शासकीय, प्रशासकीय, पोलीस, शैक्षणिक(शिक्षिका), उद्योजक (व्यावसायिक) यांनी इतर क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची निवड करून त्यांना सन्मान नारी शक्तीचा आणि शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील समाज भूषण पुरस्कार २०२१ या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कलावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी इच्छुकांनी आपली माहिती येत्या २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत माहितीसाठी अध्यक्ष दीपक काळींगण, ४.लक्ष्मी चाळ, टी. जे. रोड, अशोका गार्डन जवळ, शिवडी, मुंबई- ४०००१५ या पत्यावर पाठवण्यात यावी व तसेच ८०९७६५३५९० यांच्याशी मोबाइलवर संपर्क करत आपली माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे ,







Be First to Comment