Press "Enter" to skip to content

पंधरा दिवसांकरिता सरपंच

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी कु.राकेश खारकर

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच ताईं पुंडलिक पवार या काही दिवस रजेवर गेल्याने उपसरपंच कु.राकेश बाबूराव खारकर यांच्याकडे पंधरा दिवसांकरिता प्रभारी सरपंच म्हणून कारभार सोपविण्यात आला आहे.नविन पोसरी येथील तरुण तडफदार कु.राकेश बाबूराव खारकर यांना प्रभारी सरपंचपद मिळतात त्यांच्या चाहत्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर जल्लोष केला.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी सुधीर तोंडळेकर, माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे,माजी सरपंच कृष्णा गंगाराम पारंगे, माजी उपसरपंच दत्ता शिंदे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी माजी सरपंच अशोक मुंढे, तात्यासाहेब म्हस्कर, मारुती खाने,सुभाष आहिर, अनिल पिंगळे, प्रल्हाद मुंढे, देविदास म्हात्रे,प्रविण गीध आदींसह परिसरातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून कु.राकेश खारकर यांना शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.