Press "Enter" to skip to content

माजी विद्यार्थ्यांची शाळा

रायगड जिल्हा परिषद कृष्णनगर शाळेचा सुवर्ण महोत्सव संपन्न : ५० वर्षांनी पुन्हा एकदा माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा ग्रंथदिडी

सिटी बेल | म्हसळे कृष्णनगर |

आक्टो १८ १९७१ साली स्थापन झालेल्या रायगड जिल्हापरिषद प्राथमिक शाळा कृष्णनगर शाळेला नुकतेच ५० वर्ष पूर्ण झाली.या निमित्त कृष्णनगर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आले.

या वेळी ४० ते ५० वर्षा पूर्वी शाळेत शिकून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांनी ग्रंथदिडीचे आयोजन केले होते. या दिंडीत महिलांसोबत गावातील अबाल वृध्दांनी सहभाग नोंदवून शैक्षणीक,गाव स्वच्छता,देशप्रेम,पर्यावरण आदि विषयावर घोषणा देऊन दिंडीचा उत्साह वाढवला.

शाळेच्या नियमा प्रमाणे घंटा वाजवून शाळा भरवण्यात आली.या वेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी पांढरा हाफ शर्ट व खाकी पॅण्ट घालून शाळेत प्रवेश केला. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना आणि माजी विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन एक प्रकारे पुन्हा एकदा शाळा शिकण्याचा अनुभव देण्यात आला.

१९७१ पासून ते आजतागायत जे शिक्षक या शाळेवर कार्यरत होते त्यांचा या सुवर्ण महोत्सवात सन्मान चिन्ह,शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेट देऊन सन्मान करण्यात आला.

श्री. सुधीर पवार यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झालेल्या सत्कार समारंभात १५ हून अधिक माजी शिक्षक व हयात नसणा-या शिक्षकांच्या कुटुंबीयाचा सन्मान करण्यात आला. या वेळी हा सन्मान स्विकारताना …*जो समाज चांगल्या विचाराने झपाटलेला असतो तोच समाज शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा करतो* असे मत माजी शिक्षक श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी व्यक्त केले.हे मत मांडताना ते हेही म्हणाले की शाळा हे गावाचे वैभव आहे.आणि हे वैभव टिकवण्यासाठी ग्रामस्थांनी शाळेचा पट टिकवून ठेवावा असे अवाहन देखील केले.
२३० माजी विद्यार्थी असलेल्या या शाळे बद्दल निवडक विद्याथ्यानी आपले अनुभव कथन करून शाळेच्या आठवणी जाग्या केल्या.

श्री प्रदीप पवार, श्री.अल्पेश खेरटकर, श्री.रवि खेरटकर, श्री.दिपक खेरटकर,सौ.आरती मनवे,
वर्षा पारावे, आदी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळे बद्दल भावना व्यक्त केल्या. शाळेत आम्हाला आमचे गुरूजी शिकवत असत परंतु शाळे बाहेर, गावात आमच्या घरात अजून एक आम्हाला शिकवणारे गुरूजी होते ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधीर पवार अशा भावना
बहुतेक माजी विद्यार्थांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली.या वेळी
इंडिया झिंदाबाद फ्रेण्ड्स गृप (आय.झेड.मंडळ) रायगड चे अध्यक्ष श्री.रमेश थवई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सदर कार्यक्रमास खामगाव गृप ग्रामपंचायत सरपंच सौ प्रियांका निंबरे,उपसरपंच एकनाथ खामगावकर, ग्रामविकास अधिकारी निलिमा सुतार, श्री.प्रकाश टेंभे इंडिया झिंदाबाद फ्रेण्ड्स गृपचे सदस्य श्री.महेंद्र पाटील,श्री शंकर काथारा श्री.संजय पाटील, श्री नरेश पाटील,श्री.रवि पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी श्री राकेश पाटील,गोपाळ घरत, सूर्यभान शिरसाठ,मंदाकिनी पाटील आदि गुरुजनांनी आपल्या मनोगतातून सुवर्ण महोत्सव साजरा केल्या बद्दल ग्रामस्थ मंडळाचे भरभरून कौतुक केले. जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण दिलं जातं ,आज आपल्या रायगड मधील युपी पी एस सी परिक्षेत यश संपादन करून पहिला आय ए एस होण्याचा मान ज्या प्रतिक जुईकरांनी मिळवला ते प्रतिक जुईकर सुध्दा जिल्हापरिषद मराठी शाळेतून शिकले. असे मत श्री राकेश पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .शैलेश खेरटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात काव्य सादरीकरण स्पर्धाआणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.

चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आकांक्षा खेरटकर , व्दितीय क्रमांक जान्हवी शिर्के तर तृतीय क्रमांक मनस्वी मांडवकर हीने पटकावला. काव्य सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री.मधुकर पारावे व्दितीय क्रमांक आयुष खेरटकर तृतीय क्रमांक शैलेश खेरटकर यांनी पटकावला.

सदर कार्यक्रमास यशस्वी होण्यासाठी रविंद्र वाडकर,दर्शन पारावे,मधुकर पारावे,संग्राम पवार,परेश पोष्टुरे यांच्यासह कृष्णनगर ग्रामस्थ मंडळाने मेहनत केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.