Press "Enter" to skip to content

दसऱ्यानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव

श्री म्हैसेश्वर मित्र मंडळ करळ तर्फे गणेशोत्सव साजरा

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री म्हैसेश्वर मित्र मंडळ करळच्या वतीने दसऱ्यानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व सरकारी नियम, निकषाचे कोटेकोरपने पालन करून हा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

सकाळी 10 वाजता करळच्या राजाचे पूजन व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सायंकाळी 4 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी 7:30 वाजता श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ करळ यांचे भजन, रात्री 10 वाजता महिलांसाठी चला पैठणी जिंकूया स्पर्धा असे विविध उपक्रम घेण्यात आले.सामाजिक बांधिलकी जपत यावेळी नागरिक व ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले.16 ऑक्टोंबर रोजी मोठ्या थाटामाटात गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी श्री म्हैसेश्वर मित्र मंडळ करळचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल, उपाध्यक्ष धीरज तांडेल, खजिनदार चेतन तांडेल, सह खजिनदार मितेश तांडेल, सेक्रेटरी यतिश तांडेल, सल्लागार सतीश तांडेल, सदस्य परेश कडू, हितेंद्र तांडेल, अमित घरत, सचिन तांडेल, कुणाल कडू, दीपेश तांडेल आदी मंडळाचे पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.