उलवे नोड येथील भारती मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल चे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
उरण मधिल व्यावसाईक क्षेत्रात गेली 32 वर्ष नावारुपाला आलेले बाबुराव वर्मा आज त्यांची दोन मुले डॉ.संतोष वर्मा, डॉ.राहुल वर्मा व सुना डॉ.मोनिका सोनावणे व डॉ.कृतिका अग्रवाल वैधकिय क्षेत्रात कार्यरत आहे. यांनी कोरोनाच्या काळात देखील लोकांची सेवा चालुच ठेवली आहे.आपल्या मुलांनी वैधकिय क्षेत्राचा वापर येथील गोर गरिब जनतेची सेवा करण्या करता करावा यासाठी बाबुराव वर्मा यानी उरण विधान सभा मधिल उलवे नोड येथील सेक्टर 5 अनमोल संकल्प येथ्ये मुंबई सारख्या सर्व सोयी सुविधा युक्त असे सुसज्य हॉस्पीटल ची निर्मिती केली.नुकताच या हॉस्पीटल चे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.
सदर कार्यक्रम प्रसंगी आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, राजेंद्र पडते (उद्धोजक), माधवा नंद गन्गादत्त भट्ट (ट्रस्टी श्री गणेश एज्युकेशन चेअरमन उतरांचलमित्र मंडळ ), उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, नगरसेवक राजेश ठाकूर, अल्प सेल जिल्हा अध्यक्ष जसिम्ं गैस, जासई सरपंच संतोष घरत, वहाळ ग्रामपंचायत उप सरपंच अमर म्हात्रे, सदस्य चेतन घरत, तनसुख जैन, हरिराम वर्मा, भारती वर्मा, आदी सह व्यावसाइक क्षेतातील मंडळी व नातेवाईक मित्र परिवार उपस्थित होते.








Be First to Comment