Press "Enter" to skip to content

परेश मेहता शिवसेनेत

गुजराथी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते परेश मेहता यांचा शिवसेनेत प्रवेश

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

उरण नगरपालिकेची निवडणूक जशी-जशी जवळ येत आहे, तसे-तसे उरण शहरात राजकीय घडामोडी घडत आहेत. उरण शहरातील गुजराथी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते परेश मेहता यांनी आपल्या कुटुंबासह शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी परेश मेहता यांना भगवी शाल अर्पण करून व हाती शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

यावेळी शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, नगरसेवक समीर मुकरी, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अन्वर कुरेशी, विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, मा शहर संघटक प्रवीण मुकादम, व कार्यकर्ते उपस्थित होते.

गुजराथी समाजाचे परेश मेहता यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने गुजराथी समाज शिवसेनेकडे आकर्षित होत चालला आहे. याचा फायदा नगरपालिका निवडणुकीत होईल असा विश्वास परेश मेहता यांनी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.