Press "Enter" to skip to content

सांगा कसे जगायचे ?

रोजच्या जीवनात लागणारी भाजीपाला यांचे दर गगनाला भिडले : आता तुम्ही सांगा कसे जगायचे ?

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

पेट्रोलच्या भावाने शंभरीचा टप्पा पार केला आहे, त्याच्या मागे डिझेल सुद्धा काही कमी नाही त्याने सुद्धा शंभरी गाठली आहे, आणि गोरगरीब, सर्वसामान्य, श्रीमंतांच्या जीवनासाठी लागणारी रोजची आवश्यक गोष्ट म्हणजे भाजीपाला यांचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे गरीब सर्वसामान्यांनी कसे जीवन जगायचे मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.

कोरोना महामारी मुळे दीड ते दोन वर्ष सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, महामारीमुळे अनेकांच्या नोकर्‍यांवर गदा आली तर धंदे बंद होण्याच्या मार्गावर आहे, त्यात पेट्रोल, डिझेल ने शंभरी पार केली आहे तर घरगुती गॅस हजारी गाठण्याच्या स्थितीत आहे, भाववाढीचा भडका उडाला आहे,आता रोजच्या जीवनात लागणारी आवश्यक गोष्ट म्हणजे भाजीपाला यांचा सुद्धा दराचा भडका उडाला आहे.

मटार-200 रुपये किलो, फ्लॉवर-80 रुपये किलो, कोबी-40 रुपये किलो, टमाटर–60 रुपये किलो, घेवडा-70 रुपये किलो, काकडी-50 रुपये किलो, गवार-80 रुपये किलो, मिरची-60 रुपये किलो, वांगी-80 रुपये किलो, भेंडी-60 रुपये किलो, फरस बी-60 रुपये किलो, लालभोपळा-50 रुपये किलो, तोता पुरी आंबा-150 रुपये किलो, राजमा-120 रुपये किलो, तोंडली-60 रुपये किलो, सुरण-60 रुपये किलो, काकडी-40 रुपये किलो, बिट-40 रुपये किलो, गाजर-60 रुपये किलो, सिमला मिरची -70 रुपये किलो, शेवगा शेंगा-120 रुपये किलो,आलं-60 रुपये किलो,कांदा-50 रुपये किलो, बटाटा-20 रुपये किलो,मश्रूम-200 रुपये किलो, तर पालेभाजी मेथी-30 रुपये, कांदा पात-30 रुपये, शेपू-20 रुपये, मुळा-20 रुपये, कोथिंबीर-60 रुपये गड्डी झाली आहे.

20 ते 25 वर्षांपासून कर्जत बाजार पेठेत भाजी विक्री करणारे शिवनारायण लोदी यांनी सांगितले की परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, होलसेल बाजार पेठेत भाज्यांची आवक कमी झाली त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.