माजगांव आंबिवली येथिल भक्तांनी दिला दुर्गामातेला भावपूर्ण निरोप
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
गेले नऊ दिवस चालेला नवरात्र उत्सव, दुर्गामातेला दस-याच्या दिवशी आपट्यांची पाने म्हणून सोनं दिल्यानंतर शनिवारी माजगांव आंबिवली येथिल भक्तांनी दुर्गामातेला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
या देविचे दसर्याच्या दुसर्या च्या दिवशी अंबेमातेचे विसर्जन करण्यात येत असते.मात्र अलिकडे देवीला सोनं दिल्यानंतर विसर्जन करण्यांची प्रथा रुढ झाल्यामुळे आज तालुक्याच्या ठिकाणी फुगे, फुले,विविध प्रकारची पताके आणि एलईडी दिव्यांच्या साहाय्याने मंडळांनी विसर्जनाचे वाहन सजवले होते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांमध्येही वेगळेपण दाखवण्याचा ट्रेंड पाहायला मिळत होते.विशेष म्हणजे सार्वजनिक मंडळाने साकारलेल्या विसर्जनांचे दृश्य सर्वांचेच लक्ष वेधले जात होते.

यासाठी काही मंडळाने विशेष आकर्षणाची व्यवस्था करण्यात आल्यांचे पहावयास मिळत होते.मिरवणुकीत गरब्यावरही ताल धरलेला पहावयास मिळत असल्यामुळे विसर्जन मिरवणुकी उंच आकाशात जाणारे फोकस आणी फटाके या मिरवणुकीत विविध रंगांची उधळण करीत असल्यामुळे दुरवरच्या भक्तांचेही लक्ष वेधले जात होते. पावसांचे चिन्ह काही दाखवत नसले तरी सुद्धा पाऊस केव्हा येईल यांची शास्वती नसल्यामुळे काही मंडळानी विसर्जनाची लवकरच तयारी करण्यात आली होती.
भक्तांच्या अतिउत्साही मुळे काही ठिकाणी रात्री उशीरा पर्यंत विसर्जन करण्यात आले.यावेळी ग्राम पंचायत सदस्य रमेश जाधव,सामाजिक कार्यकर्ते भगवान जाधव,मोतीराम जाधव,अनंता जाधव,मंगेश जाधव,सुनिल पाटील,सुरेश जाधव,अतुल जाधव,ज्ञानेश्वर जाधव,संतोष जाधव,धनाजी जाधव उपस्थित होते.








Be First to Comment