उरण शहरातील मंदिरातील श्रीराम प्रभू गेली काही वर्षे आज्ञातवासात
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
देशात आयोध्ये मधील श्री रामप्रभूच्या मंदिराचे कामकाज पुर्णत्वाच्या मार्गावर असताना, बरोबरीने रायगड जिल्ह्यांतील उरण तालुक्यात ही पुरातनकालीन असणाऱ्या श्रीराम मंदिराचा जीर्णोधार वेगात सुरु आहे त्यापैकी एक मंदिर फुंडे गावात आहे तर दुसरे मंदिर उरण शहरात आहे. मात्र उरण शहरातील मंदिरातील मंदिरांतील श्रीराम प्रभू गेली 3 ते 4 वर्षे आज्ञातवासात असल्याचे विदारक दृश्य पाहून उरणमधील राम भक्तांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षा पासून उरण शहरारत असणाऱ्या पुरातन श्रीरामप्रभूच्या मंदिराच्या निर्मितीचे काम जाणीवपूर्वक धीम्यागतीने सुरु आहे.त्यामुळे या पुरातन मंदिरा मधील पुरातनकालीन असणाऱ्या मूर्तीची ठेण्याची व्यवस्था योग्यप्रकारे न ठेवल्याने या मंदिरांतील राम-लक्ष्मण-जानकी, मारुतीरायासह श्रीगणेश मूर्ती व जलारामबाप्पा यांच्या मूर्ती या एका मंदिरात अडगळीत पडल्या आहेत यामुर्तीची अवस्था पाहून रामभक्तांच्या भावनांचा उद्रेक झाला असून त्यांच्या मधून नाराजीचा सूर निघत आहे.

उरण शहरांतील श्रीराममंदिराची उभारणीच वादग्रस्त असल्याचे दिसत आहे.यातही मंदिर उभारणीच्या काळात काही अपशकुनी घटना घडून मंदिराचे बांधकाम कोसळून झालेल्या अपघातात दोन निष्पाप महिलांचा दुर्देवी अंत झाला होता. मात्र इतकी गंभीर घटना घडूनही याबाबत कोणताही राजकीयपक्ष, सामाजिक संघटना हाताची घडी तोंडावरबोट ठेऊन शांत आहेत. तर शासकीय प्रशासन व अधिकारीवर्ग अर्थपूर्ण हितसंबंध साधून कोणतीच कारवाई करण्याची टाळाटाळ करीत असल्याचे दृश्य दिसत असल्याने हे न समजण्या इतकी उरणची जनता मूर्ख नाही.
हाती आलेल्या वृत्तानुसार लवकरच याबाबत धर्मदाय आयुक्तांकडे लेखी तक्रार करून एकसत्ता विश्वस्थांच्या कारभाराची भांडाफोड करण्यात येणार आहे.त्याच प्रमाणे या प्रकरणी जनहित याचिकाही दाखल करण्यात येणार आहे. याच कालावधीत फुंडे गावांतील श्रीराम मंदिराचे कामही सुरु आहे.मात्र ग्रामस्थांनी मंदिरांतील मूर्ती मोठया प्रशस्त हॉलमध्ये सूरक्षीत पणे ठेवल्या असून नित्यपणे त्याची पूजा अर्चा व उत्सव ग्रामस्थांच्या वतीने साजरे करण्यात येत आहेत.

उलटपक्षी उरण शहरांतील मंदिरांतील मूर्तीची वेळोवेळी दखल न घेतल्याने मूर्तीची दुरवस्था झाल्याचे चित्र पहावयास मिळते. काहीही असले तरी मुठभर लोकांच्या फायद्यासाठी सर्वाना वेठीस धरून मंदिरामध्ये दुकाने थाटणे, गाळे काढून त्याची विक्री करणे अथवा मंदिराचे व्यवसाईक दृष्ट्या रुपांतर करणे हे धोरण चुकीचे असल्याची चर्चा जनमानसात आहे.
त्याच बरोबरीने उरणच्या मंदिरांतील राम-लक्ष्मण-जानकी, मारुतीरायासह श्रीगणेश मूर्ती व जलारामबाप्पा यांच्या मूर्ती वनवासात नेण्याचे काम ज्या कोणी महाभागानी केले आहे. त्यांना याचा प्रत्यय लवकरच मिळेल कारण रामप्रभू हे सत्यवचनी व एकबाणी होते. तरी अशा स्वार्थी व संधीसाधूना श्री रामचंद्र प्रभुनी अद्दल घडवावी अशी चर्चा उरणच्या जनतेत दबक्या आवाजात सुरू आहे.








Be First to Comment