आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठण्यात कोरोना योद्धयांचा सत्कार
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या वतीने व नागोठणे विभाग महिला आघाडीच्या सहकार्याने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी व आशा सेविका या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. नागोठणे प्रा. आ. केंद्रातील सभागृहात शनिवारी (दि.१६) सकाळी हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कोरोनाच्या महाभयंकर जागतिक महामारीत आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडणारे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी व सुमारे ५८ आशा सेविकांचा यावेळी रोहा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीकडून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याचबरोबर कोविड-१९ च्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे पाठविण्यात आलेले प्रशस्तीपत्र यावेळी सर्व कोरोना योद्धयांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे विभागीय नेते शिवरामभाऊ शिंदे, विलास चौलकर, चंद्रकांत गायकवाड, विक्रांत घासे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या रोहा तालुका अध्यक्ष प्रीतम पाटील, जिल्हा सरचिटणीस आशा शिर्के, तालुका उपाध्यक्षा रिचा धात्रक, कल्पना टके, निष्ठा विचारे, तालुका कार्यकारिणी सदस्य नंदा गायकवाड, सुरेखा पार्टे, नागोठणे शहर अध्यक्षा सुजाता जवके, विभाग अध्यक्षा स्नेहल काळे, शहर उपाध्यक्ष प्रतिभा तेरडे, नागोठणे ग्रा.पं. सदस्या माधुरी महाडिक, माधुरी सोष्टे, उषा धजेकर, सुनिता तटकरे, समीक्षा घावटे, स्नेहा ताडकर, सोनाली वाचकवडे, सारिका खंडागळे, रोहिदास हातनोलकर, उमेर सांगडे आदींसह आरोग्य सहाय्यक यशवंत करजेकर, आरोग्य सेवक वंदन तांबोळी, पळस सी.एच.ओ. डॉ. नीलिमा जाधव, ऐनघर सी.एच.ओ. पूजा चरकरी, यशवंतखार सी.एच.ओ. अतुल भुवड, खांब सी.एच.ओ. आम्रपाली भालेराव, मेधा सी.एच.ओ. शिल्पा बंगाले आदींसह आशा सेविका यावेळी मोठ्या संन्ख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात विलास चौलकर, प्रीतम पाटील, स्नेहल काळे, सुरेखा पार्टे यांनी आपल्या मनोगतातून आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवीत असलेल्या या उपक्रमाची माहिती देऊन अशा सेविकांच्या कोरोना काळातील कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे शहर सचिव रोहिदास हातनोलकर यांनी तर आभार प्रदर्शन आरोग्य सेवक वंदन तांबोळी यांनी केले.








Be First to Comment