धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रसायनीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन खुले करून अनुयायांनी घेतले दर्शन
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी येथील बौद्ध समाजाचे अस्मिता असणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन एच. ओ. सी .कंपनीच्या ताब्यात असून ऑगस्ट 2021 पासून कंपनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन यास कुलूप ठोकले आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर दर्शनासाठी समाजबांधवांसाठी खुले करण्यात यावे अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती यांनी एच ओ सी .व बी.पी.सी.एल व्यवस्थापनाला केली होती परंतु त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उघडण्यास मनाई केली यामुळे परिसरातील आंबेडकरी अनुयायांनी धम्मचक्र दिनाच्या औचित्य स्थित साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे कुलूप काढून आत प्रवेश करत आतील गाभाऱ्याची साफसफाई करून पूजा अर्चा केली.

यावेळी आर.के.कांबळे, काशिनाथ कांबळे ,शांताराम कांबळे, माजी सरपंच संदीप मुंढे, मामा कांबळे, भालेराव विजय कांबळे. आशिष जाधव,शैलेश सोनवणे, सचिन कांबळे,संतोष जाधव,सचिन चितळे, पाटेकर गुरुजी,अरुण गोडघाटे, उषाताई कांबळे,कमल कांबळे,मनीषा कांबळे, भावना सोनवणे,पद्मा जाधव यांच्यासह आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणताही अनुचित प्रकार घरून घडू नये म्हणून रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश लांगी, झावरे यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताची कामगिरी व्यवस्थित पार पाडली.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.








Be First to Comment