Press "Enter" to skip to content

आपट्याची रोपं भेट

दसऱ्याला आपट्याची पाने न देता आपट्याची रोपं भेट देऊन केला सण साजरा

सिटी बेल | पनवेल |

आर्या वनौषधी संस्थे तर्फे आपट्याची पाने सोनं म्हणून एकमेकांना भेट न देता आपटा वृक्षाची रोपे भेट देवून दसरा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

साडेतीन मुहूर्ता पैकी एक असलेल्या दसरा या सणाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेने आपटा या वृक्षाची १०१ रोपे भेट देवून एक आगळा वेगळा उपक्रम राबविला.या वेळी संस्थेचे दत्तू कोल्हे यांनी आपटा या वृक्षा बद्दल माहिती असलेली पत्रके व आपटा या वृक्षाच्या औषधी गुणधर्माची माहिती वनौषधी प्रेमींना दिली.

आज आपल्याकडे वृक्ष संवर्धना बद्दल चांगली जनजागृती होत आहे.दसऱ्याला आपट्याच्या पाना सोबतच आपट्याची रोपे भेट दिल्यास व आपट्याची रोपे लावल्यास नक्कीच या वनौषधीचे चांगले संवर्धन होईल असे वनौषधी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी यावेळी सांगितले.

गेल्या दहा वर्षापासून वनौषधी तज्ञ सुधीर पाटील आपट्याची जास्तीत जास्त रोपे तयार करून वाटप करण्याचे काम करत असून या वृक्षाचे बी सुद्धा ते वनौषधी प्रेमींना भेट देत आहेत असे या वेळी दत्तू कोल्हे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.