जासई हायस्कूल मध्ये डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
रयत शिक्षण संस्थेचे श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष कामगार नेते भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला.गाव अध्यक्ष यशवंत घरत,सेनादल अध्यक्ष पद्माकर घरत, विद्यालयाचे प्राचार्य संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग,रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख,ज्युनिअर विभाग प्रमुख शिंदे सर,डी.बी.म्हात्रे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.








Be First to Comment