पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते चिंचवली बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे आणि सामाजिक कार्यकर्ते राकेश शिंदे यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेल्या चिंचवली एस. टी. थांब्याचा लोकार्पण सोहळा रायगड च्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला.
यावेळी जि.प. सदस्य दयाराम पवार, भाई टके, राकेश शिंदे, महेंद्र पोटफोडे , नरेंद्र जाधव, आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, उपसरपंच श्रीकांत चव्हाण, गणेश वाचकवडे मनोज शिर्के, दर्शन तेलंगे, चिंचवली सरपंच दर्शना पवार, प्रसाद येरुणकर, शिरिष येरुणकर, महेश येरुणकर, सुनिता मालुसरे, उषा मालुसरे, वैशाली मालुसरे, चंद्रकांत मालूसरे, दयाराम भोसले तसेच चिंचवली येथील महिला ग्रामस्थ त्यांचप्रमाणे विविध परिसरातील कार्यकर्ते जेष्ठ नागरिक त्याचप्रमाणे सुतारवाडी येथील मोहन दोशी, पोलीस पाटील संतोष दळवी, सामाजिक कार्यकर्ते चिंतामण दळवी उपस्थित होते.
चिंचवली तसेच अन्य परिसरातील प्रवाशांसाठी बस थांब्याची व्यवस्था करून दिल्याबद्दल बेंडू येरुणकर यांनी आभार मानले .








Be First to Comment