Press "Enter" to skip to content

झेंडू फुलांचे दर कडाडले

दसरा उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत फुलांची आवाक थोड्या प्रमाणात मंदावली : परतीच्या पावसाचा फुलांना फटका

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

शुक्रवारी येत असलेला दसरा च्या सणांच्या निमित्ताने बाजार पेठेत विविध प्रकारची फुले दाखल झाली आहे.मात्र गेले काही दिवस परतीचा पाऊस सायंकाळी येत असल्यामुळे यांचाच फटका फुलांना बसल्यामुळे विविध प्रकारची फुले आणी झेंडूच्या फुलांचे दर कडाडले असे विक्रेते कडून सांगण्यात येत आहे.अन्य बाजारपेठेत झेंडू फुले विक्रीसाठी आली असून मागील काही वर्षापेक्षा ह्या फुलांच्या किंमतीत वाढ झाली असल्याने सामान्य नागरिकांना ही फुले खरेदी करण्यास परवडत नाहीत. यावर्षी फुलांचे पीक कमी असल्याने घाऊक बाजारात फुलांचे भाव गगनाला भिडल्याने किरकोळ विक्रीवर त्याचा परिणाम होत आहे

यावर्षी वरुण राजा मोठ्या प्रमाणावर बरसला असल्याने त्याचा परिणाम विविध पिकांवर झाला असून फुल शेती कमी प्रमाणात आल्याने राज्यातील शेतकरी राजा हवालदिल झाल्याची चर्चा असल्याने फुलांचे पिक कमी आल्याने पुणे, मुंबई, कोकणातील मुख्य बाजारपेठेत या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यातच फुलांचे भाव गगनाला भिडल्याने किरकोळ व्यापारी चिंताग्रस्त आहेत.

खालापुर तालुक्यातील खोपोली, चौक, मोहपाडा बाजारपेठत नागरिकांची या बाजारपेठेत ऐन नवरात्र उत्सवाची मोठी वर्दळ सुरू झाली असुन दसरा सणात झेंडूच्या फुलांना एक विशिष्ट महत्त्व असल्याने बाजारपेठेत झेंडू फुलांची मोठी विक्री होत असते. बाजारात झेंडूच्या फुलांची वाढती मागणी पाहता झेंडू फुलांची बाजारपेठेत कमरता भासत असल्याने त्यातच फुलांचे भाव गगनाला भिडल्याने झेंडूची फुले खरेदी करण्यास सामान्य नागरिकांना परवडत नसल्याने त्याच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.