पनवेल तालुक्यातील माडभुवन आदिवासीवाडी येथे “रेशन कॅम्प” ला उस्फूर्त प्रतिसाद : जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांचा अभिनव उपक्रम
सिटी बेल | पनवेल |
जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या संकल्पनेतून पनवेल तालुक्यातील माडभुवन आदिवासीवाडी येथे “रेशन कॅम्प” कॅम्प घेण्यात आला .
अनेक आदिवासी वाड्यांमध्ये रेशन कार्ड संमंधीत खूप प्रश्न आहेत यासाठी येथील आदिवासींना अनेक हेलपाटे शासन दरबारी मारावे लागतात. वेळ,पैसा ,धावपळ करूनही रेशन कार्ड चा प्रश्न सुटत नाही. ही बाब लक्ष्यात घेऊन आज पहिला कॅम्प माडभुवन वाडी येथे आयोजित केला होता.

यावेळी तहसिल कार्यालयातील दोन अधिकारी उपस्थित राहुन माडभुवन वाडी चा रेशन कार्ड चा प्रश्न मार्गी लावला आहे. यावेळी दत्ता भोईर ,दर्शन भोईर , पांडुरंग लेंडे,अनंता लेंडे ,शनिवार उघडा,बुधाजी दोरे,आणि माडभुवन चे तरुणांनी खूप मेहनत घेतली आणि कॅम्प यशस्वी केल्याबद्दल या सर्वांचे अभिनंदन ज्ञानेश्वर घरत यांनी केले. त्याच बरोबर पनवेल चे तहसिलदार विजय तळेकर आणि त्यांचे आधीकारी वर्ग यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले. आता लवकरच सारसई विभागातील सर्व वाड्यांचे एकाच दिवशी रेशन प्रश्नावर कॅम्प घेणार असे ज्ञानेश्वर घरत यांनी यावेळी जाहीर केले.








Be First to Comment