कर्जत नगरपरिषदेचे रोड व्हॅक्युम स्विपर मशीन 1 वर्षाच्या कालावधी नंतर पुन्हा दिसले रस्त्यावर
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या गाड्याच्या ताफ्यात 1 वर्षा पूर्वी एका वाहनाची भर पडली होती, ते म्हणजे रोड व्हॅक्युम स्विपर मशीन मात्र ते दाखल झाल्यानंतर पुन्हा कधीच दिसले नव्हते ते आज दि.13 ऑक्टोबर रोजी कर्जत शहरातील रस्ते साफ करताना चक्क दिसले.
नगरपरिषदेच्या फंडातून 47 लाख 33 हजार रुपये खर्च करून रोड व्हॅक्युम स्विपर मशीन खरेदी करण्यात आले आहे. ही मशीन खरेदी करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे मागणी केली होती.
नगरपरिषद हद्दीतील बहुतांश रस्ते हे कॉक्रीट चे झाले आहेत, या सर्व रस्त्यावर साफसफाई ठेवणे तेवढेच जिगरीचे आहे आणि त्यासाठी मनुष्य बळ असणे गरजेचे आहे, याचा विचार करून नगरपरिषदेने रोड व्हॅक्युम स्विपर मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. नगरपरिषद फंडातून 47 लाख 33 हजार रुपये खर्च करून ही गाडी खरेदी करण्यात आली. त्यामुळे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या गाडीच्या ताफ्यात अजून एका वाहनाची भर पडली होती.

ही गाडी 20 मे 2020 रोजी लोकार्पण झाली होती, या गाडीच्या माध्यमातून रस्ते स्वच्छ होणार आहेत रस्त्यावर असलेली धूळ सुद्धा ही मशीन व्दारे साफ होणार होती, मात्र नंतर तांत्रिक कारणामुळे गाडी पुन्हा रस्त्यावर फिरली नाही, काही दिवस ही गाडी नगरपरिषद कार्यालय उभी होती, मात्र 1 वर्षाच्या कालावधी नंतर आज दि.13 मे रोजी ही गाडी रस्ते साफ सफाई करताना दिसली.
पावसाळ्यात गाडी च्या माध्यमातून साफ सफाई होत नाही असे आरोग्य विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले, आता साफसफाई साठी कंपनी ची माणसे आहेत त्यांच्या समवेत नगरपरिषद कर्मचारी आहेत असेही सांगण्यात आले.








Be First to Comment