श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे मनसेची संघटना बांधणी
सिटी बेल | श्रीवर्धन | केतन माळवदे |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, पक्षवाढीसाठी तसेच संघटना बांधणीसाठी श्रीवर्धन तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दांडगुरी शाखाध्यक्ष पदी सौरभ रामचंद्र पवार आणि उप शाखा अध्यक्ष सिद्धेश सदानंद शेलार यांची तसेच सचिव प्रवेश दत्ताराम सावंत, शाखा संपर्क अध्यक्ष प्रफुल गजानन सावंत नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शाखा राजदूत पदी भरत पांडुरंग जाधव , वैभव विजय पवार, अक्षय दिगंबर धांदरुत, संदीप रघुनाथ लाड, आदित्य महेश पवार, सुमित
वसंत धांदरुत, गणेश दत्ताराम पवार इत्यादींची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील गावागावात मनसेच संघटन मजबूत होत आहे , तालुकाअध्यक्ष सुशांत पाटील व मनसे तालुका संपर्क अध्यक्ष प्रतीक राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली आहे .








Be First to Comment