बालिका दिनानिमित्त बेटी पढाओ-बेटी बचाव रॅलीसह चित्रकला स्पर्धा संपन्न
सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
भारतभर जागरूकता अभियान व पोहोच कार्यक्रमातंर्गत आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेसह बेटी बचाओ-बेटी पढाओ रँलीचे आयोजन करून बालिका दिन उत्साहात संपन्न करण्यात आला.
भारतभर जागरूकता अभियान व पोहोच कार्यक्रमातंर्गत राष्ट्रीय विधी प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व दिवाणी न्यायाधीश क स्तर रोहा तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती रोहा यांच्या वतीने दि.२ आँक्टो. ते १४ आँक्टो.या कालावधीत सदरील अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने अधिकार क्षेत्रातील रोहे तालुक्यातील कोएसो मेंहेंदळे हाय.रोहा,द.ग.तटकरे माध्य.विद्या.कोलाड, गु.रा.अग्रवाल हाय.नागोठणे व न्यू इंग्लिश स्कूल चणेरा या चार केंद्रावर इ.५ वी ते ७ वी व इ.८ वी ते १० वी या गटातील विद्यार्थ्यांकरिता आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर कोएसोच्या मेंहेंदळे
हायस्कूल प्राचार्य, सर्व शिक्षक व्रुंद व शिक्षकेतर कर्मचारी व्रुंद यांच्या विशेष सहकार्याने बेटी बचाव-बेटी पढाओ रँलीचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी दिवाणी न्यायाधीश एस.डी.कमलाकर, पो.उपनिरिक्षक अविनाश ठाकरे,गट शिक्षणाधिकारी सादुराम बांगारे, मेंहेंदळे हाय.प्रा.मोसे,धाटाव केंद्र प्रमुख नारायण गायकर,संतोष खलापकर,विद्या रोहेकर,ब्रिजेश भादेकर,विजय वेळे,विलास सुटे,विजय धोत्रे,नंदकुमार भादेकर,आशा वेल्हाल,राजेश्री गरूड,वनिता पवार, विकर्ण दांडेकर आदींसह वाहतूक शाखा सर्व कर्मचारी व्रुंद उपस्थित होते.या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रोहे,नागोठणे,कोलाड व चणेरा विभागातील बीट विस्ताराधिकारी, विविध शाळांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकव्रुंद यांनी मोलाचे सहकार्य केले.








Be First to Comment