रायगड जिल्हा परिषद शाळा चोळे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत : सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांनी घेतली दखल
सिटी बेल | मंजुळा म्हात्रे | नागोठणे |
गेले दोन वर्ष कोरोना महामारी मुळे शाळा पूर्णता बंद होत्या परंतु आता कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत असल्यामुळे शाळा टप्या टप्यात सुरु झाल्या आहेत.दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे व चक्रीवादळा मुळे जिल्हा परिषद शाळा चोळे पूर्णता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. शाळेवरील पत्रे, धापे फुटून गेल्या मुळे विद्यार्थांना गलक्या वर्ग खोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवताना पाहायला मिळत आहे.
सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांनी दखल घेत मुख्याध्यापक व शाळा शिक्षण समिती सोबत शाळा दुरुस्ती बाबत चर्चा केली. या वेळी मुख्याध्यापक पाटील मॅडम व शाळा समितीचे अध्यक्ष कृष्णा म्हात्रे यांनी शाळा दुरुस्ती बाबत सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर कामाला सुरवात करणार असल्याच आश्वासन दिलं.
या वेळी उपस्थित शाळा समिती अध्यक्ष कृष्णा म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, नितीन पाटील, दत्ता कुथे, मधुकर गदमले, दिलीप बैकर इत्यादी पालक उपस्थित होते.








Be First to Comment