Press "Enter" to skip to content

मोफत डोळे तपासणी

लायन्स क्लब पनवेल रॉयल प्राईड यांनी इंटरनॅशनल ऑक्टोबर सर्विस विक जोरदारपणे साजरा केला

सिटी बेल | पनवेल | घन:श्याम कडू |

लायन्स क्लब पनवेल रॉयल प्राईड यांचा इंटरनॅशनल ऑक्टोबर सर्विस विक दिनांक 2 ऑक्टोबर 2021पासून सुरू झाला. याचे उद्घाटन एल. जी. टावरी जी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन्स क्लब जिल्हा 3231 A2 यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन झाले.

त्यानंतर सदरचा कार्यक्रम तहसीलदार कार्यालय कार्यालय, पनवेल येथे तहसीलदार विजय तळेकर व गव्हर्नर लायन एल. जी. टावरी जी, लायन मुकेश तनेजा, लायन ए के शर्मा, लायन मनीष लाडगे, या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि मान सन्मान रिजन चेअरपर्सन लायन सौ ज्योती देशमाने व नागेश देशमाने जी यांच्या हस्ते करण्यात आले. वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून सुरुवात झाली.

पनवेल तहसील कर्मचारी व पनवेल शहर पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांसाठी मोफत डोळे तपासणी, आरोग्य तपासणी, ऑर्थोपेडिक सर्जन यांनी विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर कार्यक्रमास विविध लायन्स क्लबचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ पनवेल रॉयल प्राईड यांच्या वतीने अध्यक्ष लायन अंबादास यादव, सचिव लायन सौ विजयश्री पाटील, खजिनदार लायन अमित गोखले यांनी प्रतिनिधित्व केले.

त्यानंतर जनकल्याण आश्रम कोळके येथे निराधार मुलाचा वाढदिवस साजरा केला. त्याचप्रमाणे गिरिजाश्रम, चिपळे येथील वयोवृद्ध लोकांना डायपर डिस्ट्रीब्यूशन करण्यात आले. सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

गरजूंना लायन्स क्लब पनवेल प्राईड व इतर लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गोरक्षनाथ मंदिर वहाळ येथे अन्नदान करण्यात आले. सदरचे कार्यक्रमास लायन एल जी तावरे यांच्या हस्ते अन्नदान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

स्वप्नालय पनवेल येथे मोफत आरोग्य तपासणी व डोळे तपासणी कार्यक्रमाचे आयोजन आधार हॉस्पिटल पनवेल व नायर आय हॉस्पिटल न्यु पनवेल यांचे संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. ऋषीवन वृद्धाश्रम आसूड गाव पनवेल येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर नायर हॉस्पिटल नवीन पनवेल यांचे संयुक्त विद्यमाने तसेच मोफत आरोग्य शिबिर आधार हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. तसेच डायपर डिस्ट्रीब्यूशन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन एल. जी. टावरी यांनी केले. प्रमुख पाहुणे यांचे सोबत सौ ज्योती देशमाने रिजन रिजन पर्सन झोन दोन यानी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमास ए के शर्मा व ट्रेवर मार्टिस यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित गोखले खजिनदार यांनी केले फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट श्याम बाविस्कर यांनी आभार व्यक्त केले सदर वृद्धाश्रम मध्ये डोळे तपासणी व आरोग्य सुविधा देण्यासाठी केलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे डिस्ट्रिक्ट गवर्नर लायन एल. जी. टावरी यांनी केला.

ओम साई दत्त प्रसाद क्लिनिक करंजाळे येथे मोफत नेत्ररोग तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे करंजाडे चे सरपंच रामेश्वर आंग्रे व सौ ज्योती देशमाने रिजन रिजन चेअर पर्सन उपस्थित होते डॉक्टर विक्रम पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व लायन अंबादास यादव यांनी प्रमुख पाहुणे रामेश्वर आंग्रे व ज्योती देशमाने रिजन चेअरपर्सन यांचा सन्मान केला. रामेश्वर आंग्रे व सौ ज्योती देशमाने यांनी सदर च्या कार्यक्रमात उपक्रमाचे कौतुक केले. सदर कार्यक्रमास सौ सई पवार, प्राजक्ता शहा याही उपस्थित होत्या त्याचप्रमाणे प्लास्टिक वेस्ट वाँरियर करंजाडे ग्रुपचे अध्यक्ष सौ सई पवार व प्रमुख प्राजक्ता शहा यांचेही स्वागत अंबादास यादव यांनी केले सर्व प्लास्टिक वेस्ट वाँरियर यांना कापडी पिशव्या घेऊन सन्मानित करण्यात आले.

पर्यावरणाच जतन करण्याचं काम पनवेल वेस्ट वाँरियर संघटना कौतुकास्पद आहे. सौ ज्योती देशमाने यांनी लायन्स क्लब ची संकल्पना, उद्दिष्ट सर्वांना सांगितले. सर्वांचे आभार डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन अमित गोखले यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.