अभिनव ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालय कर्जत येथे आय टी ( IT) विषयाचा प्रारंभ : विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
अभिनव ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालय कर्जत येथे आय टी ( IT) विषयाचा प्रारंभ, विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.
कर्जत तालुका हा ग्रामीण बहुल भाग असल्याकारणाने बहुतांशी विद्यार्थी ग्रामीण भागातुन कर्जत ह्या तालुक्याच्या शहरात येऊन विविध शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असतात. इयत्ता दहावी नंतर कर्जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना काही वर्षांपुर्वी कर्जत शहराबाहेर खोपोली, नेरळ, बदलापुर, उल्हासनगर येथे जाऊन महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे लागत होते. परंतु, सुमारे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेने कनिष्ठ महाविद्यालय सुरू केल्याने तालुक्यातील हजारो विद्यार्थी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहेत.
कर्जत तालुक्यातील विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कुठेही मागे राहु नये ह्या उदात्त हेतुने आय टी (IT) विषयाचा अभ्यासक्रम ह्या वर्षीच्या 2021-22 ह्या शैक्षणिक वर्षापासुन अभिनव ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाने सुरू केला असुन विद्यालयात अद्यावत अशा संगणक प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे.

सदर अद्यावत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन संस्थेचे पदाधिकारी तथा कार्याध्यक्ष जयंत वैद्य, सचिव जनार्दन मोघे, खजिनदार तथा अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष विनायक चितळे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सच्चीदानंद जोशी ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.आय टी (IT) प्रयोगशाळेचे उद्घाटन संगणकाचे स्विच दाबुन करण्यात आले.
संगणक प्रयोगशाळेचे अद्यावत स्वरूप पाहुन संस्थेचे कार्याध्यक्ष जयंत वैद्य यांनी समाधान व्यक्त केले. सदर प्रसंगी शालेय समितीचे सदस्य गजानन गडकरी, रविंद्र खराडे, अच्युत कोडगिरे, पालक शिक्षक संघाच्या सहसचिव राजश्री हजारे, अभिनव ज्ञान मंदिर प्रबोधिनी एज्युकेशन ट्रस्टचे सचिव नंदकुमार मणेर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सच्छिदानंद जोशी यांनी केली तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य योगेश्वर निकम यांनी केले.








Be First to Comment