रसायनीत महाविकास आघाडीकडून कडकडीत बंद, व्यापारी वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकर्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यातच उत्तर भारतातील शेतकऱ्यांचे आपल्या न्याय हक्कासाठी सुरू असलेले आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते . केंद्र शासनाच्या या भूमिकेचा जाहिर निषेध करण्यासाठी सोमवारी सकाळपासून रसायनी परिसरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी यात महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र बंदचे आयोजन केले होते. या बंदला वासांबे मोहोपाडा व्यापारी असोसिएशन,रिक्षा चालक मालक संघटना आदींनी पाठिंबा देवून बंद यशस्वी केला.यावेळी रिस,वावेघर,चांभार्लीं बाजारपेठ ही बंद होत्या.

सर्वप्रथम मोहोपाडा बाजारपेठेतील शिवाजी चौकात महाविकास आघाडीच्यावतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यानंतर मोहोपाडा बाजारपेठ ते तिन आसनी रिक्षा स्टॅण्ड तेथून नवीन पोसरीतून पुन्हा मोहोपाडा बाजारपेठ अशी महाविकास आघाडीच्यावतीने पदयात्रा काढण्यात आली.यावेळी बाजारपेठ चौकात महाविकास आघाडीच्यावतीने पदाधिका-यांनी निषेध दर्शविला.
महाविकास आघाडी सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या बंदला तमाम नागरीक, व्यापारी, कामगार यांनी पाठींबा देवून परीसरात बंद यशस्वी केला.

यावेळी महाविकास आघाडीचे सभापती वृशाली पाटील,माजी सभापती रमेश पाटील, माजी उपसभापती गजानन मांडे,माजी सरपंच संदिप मुंढे,माजी सरपंच कृष्णा पारंगे,माजी सरपंच अशोक मुंढे,माजी सरपंच शशिकांत मुकादम,प्रभारी सरपंच राकेश खारकर,माजी उपसरपंच सद्गुणा पाटील, माजी उपसरपंच दत्तात्रेय शिंदे,माजी उपसरपंच बंधू बडेकर, दत्ता खाने, महाराष्ट्र युवक कॉंग्रेस सचिव प्रशांत गायकवाड आणि निखिल डवले,काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना म्हात्रे, तालुका युवा सेना अधिकारी संतोष पांगत,पर्यावरणाचे प्रमोद राईंलकर, जेष्ठ शिवसैनिक मारुती खाने, शेकापचे विभाग अध्यक्ष सुभाष आहिर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल राऊत, कैलास म्हात्रे,श्याम म्हस्कर,अजय म्हस्कर, देविदास म्हात्रे,प्रल्हाद मुंढे, सुभाष पाटील,समीर म्हात्रे आदी उपस्थित होते.
रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.








Be First to Comment