Press "Enter" to skip to content

नवरात्रोत्सवात लसीकरणाचा जागर

महिलांसाठी “कोविड विशेष लसीकरण मोहीमेस” नागोठण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर ना. आदितीताई तटकरेंचा पुढाकार

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून रायगडच्या पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून रायगड जिल्ह्यातील १८ वर्षावरील सर्व महिलांसाठी सोमवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी राबविण्यात आलेल्या महिलांसाठी “कोविड १९ विशेष लसीकरण मोहीमेस” नागोठण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागोठण्यातील उर्दू हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर नागोठण्यातील २५० महिलांचे कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

नागोठण्यातील उर्दू हायस्कूल या लसीकरण केंद्रावर नागोठण्यातील राष्ट्वादी काँग्रेसच्या नेतेगण व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन केवळ महिलांसाठी असलेल्या या कोविड लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्वादी काँग्रेसचे विभागीय नेते भाई टके, राष्ट्वादीच्या पेण विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष विलास चौलकर, राष्ट्वादीचे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, शहर सचिव रोहिदास हातनोलकर, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, विनय गोळे, भारत भोय, बिपीन सोष्टे, शहर उपाध्यक्ष झिशान सय्यद, उमेर सांगडे, जाफर कुरेशी, शोयेब सय्यद, मुनाफ सय्यद आदींसह राष्ट्वादी काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

नागोठणे उर्दू हायस्कूल केंद्रातील या कोविड लसीकरण मोहिमेसाठी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. आदित्य शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक वंदन तांबोळी, मेढा उपकेंद्राच्या सी.एच.ओ. पूजा चरकरी, जगदीश मोकल, परिचारिका भावना महाले यांनी सहकार्य केले.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केल्याने महिलांचे जीवन अधिक सुरक्षित करणे व त्यांचे लसीकरणाचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने पालकमंत्री ना.कु. आदिती तटकरे यांनी “फक्त महिलांसाठी कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम” राबविण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांनी केले होते. त्यानुसारच ही मोहिम यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते सर्व नियोजन केले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.