नागोठण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
उत्तर प्रदेश लखीमपुर खेरी येथे गाड्या अंगावर घालून बळीराजाला चिरडणाऱ्या केंद्र सरकारचा जाहिर निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली असतानाच रायगड जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे यांच्या आशिर्वादाने तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे शहर आणि विभाग राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारचा सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जाहिर निषेध करण्यात आला. यावेळी नागोठण्यातील सर्व दुकानदार, व्यावसायिक व व्यापा-यांनी या बंदला संमिश्र प्रतिसाद दिला.
यावेळी अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु ठेवण्यात आली होती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून झालेल्या दोन लाॅकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या येथील काही व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरु ठेवली होती.
निषेध असो निषेध असो केंद्र सरकारचा निषेध असो, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी, शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो अशा विविध घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची रॅली बाजारपेठ, खुमाचा नाका मार्गे नागोठणे पोलीस ठाण्यापर्यंत आल्यानंतर रॅलीची सांगता झाली. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते दिलीपभाई टके, विलास चौलकर, कृष्णा धामणे, वसंतराव महाजन, सुधाकर जवके, राष्ट्वादीचे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, शहर सचिव रोहिदास हातनोलकर, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, विनय गोळे, सचिन कळसकर, युवक शहर अध्यक्ष कुणाल तेरडे, पप्पूशेठ अधिकारी, अलिमभाई मांडलेकर, निवास पवार, प्रकाश मोरे, दिनेश घाग, ऍड. श्रीकांत रावकर, सिद्धार्थ काळे, अमित जांबेकर, नितीन पत्की, बिपीन सोष्टे, शहर उपाध्यक्ष झिशान सय्यद, मनोज ताडकर, शाम पाटील, निलेश म्हात्रे आदींनी सहभाग घेतला होता.








Be First to Comment