उरणमध्ये व्यापाऱ्यांनी पाळला कडकडीत बंद : महाराष्ट्र बंद ला दिला १००% प्रतिसाद
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ, लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ उरण महाविकास आघाडीने आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी बंद पुकारला होता. त्याला उरणमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला होता.या बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या.

आज सकाळपासून व्यापारी वर्गांनी बंद ठेवून आपला पाठींबा दर्शविला.यावेळी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, शेकाप तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, सभापती समिधा म्हात्रे, उपसभापती शुंभागीं पाटील, डॉ. मनीष पाटील, विनोद म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी, शहर अध्यक्ष किरीट पाटील, गटनेते गणेश शिंदे
किरीट पाटील, नरेश घरत, निलेश म्हात्रे, वैशाली पाटील, सीमा घरत, संध्या ठाकूर, रेखा घरत, सुजाता गायकवाड, वंदना पवार, मार्तंड नाखवा, मिलिंद पाडगावकर, विनोंद पाटील, अतुल ठाकूर, गणेश पाटील आदींसह महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडीतर्फे शहरात रॅली काढण्यात आली होती. उरण शिवसेना शहर शाखेजवळ रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. उरणमध्ये आजच्या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.









Be First to Comment