महाविकास आघाडी तर्फे पुकारलेला महाराष्ट्र बंदला नागोठणे गावामध्ये मोठा प्रतिसाद
सिटी बेल | नागोठणे | याकूब सय्यद |
लखिंपुर खेरी उत्तर प्रदेश येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात गोरगरीब शेतकऱ्यांचा नरसहांर हल्लयाचा व भाजप सरकारचा नागोठणे गावात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद धात्रक, उपसरपंच मोहन नागोठणेकर, प्रकाश कांबळे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सगीर अधिकारी, शहराध्यक्ष अशपाक पानसरे, काँग्रेस अल्पसंख्याक समाज रोहा तालुका अध्यक्ष याकूब सय्यद, शिवसेना युवा कार्यकर्ते समीर भिकन, इक्बाल शिंदी, आदिल पानसरे, सद्दाम दफेदार, शाहिद सय्यद, सुधीर येरुंकर, मन्सूर सय्यद, मुकेश भोय, विजय शिर्के तसेच अनेक महाविकास आघाडीचे नागोठणे गावातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment