सिटी बेल | पाणदिवे | मनोज पाटील |
उर्णोली या गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थित साई सेवा मंडळ उर्णोली- पेण यांच्या वतीने डॉ. संजय ठाकुर यांना कोरोना योद्धा तर त्यांच्या सौभाग्यवती रुपाली संजय ठाकुर यांना कोरोना योद्धा सौभाग्यवती सन्मान देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
जागतिक कोरोनाच्या महामारीत सुरूवातीच्या काळात जनतेत अतिशय भितीदायक वातावरण निर्माण झाले होते.
नक्की कोरोना कसा आहे आणि त्याच्यावरील उपचार पद्धती नक्की काय या विषयी वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा संभ्रमावस्था निर्माण झाली होती. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर यांच्यामध्ये सुद्धा साशंकता निर्माण झाली होती. विशेषतः या महामारीच्या काळात सेवा देणारे अनेक डाॅक्टर सुद्धा मृत्युमुखी पडले. यामुळे ब-याच अंशी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी भितीपोटी आपले खाजगी दवाखाने बंद ठेवणे पसंत केले.
यामुळे जनतेचे खुप हाल झाले. जेथे तेथे डॉक्टरांची वानवा भासु लागली आणि याचा परिणाम जनतेत सर्वत्र भितीदायक वातावरण निर्माण झाले. अशा काळात दादर – पेण येथील डाॅक्टर संजय ठाकुर यांनी मात्र आपली सेवा दररोज अहोरात्र सेवा सुरू ठेवली. तीसुद्धा अवघ्या तीस रुपयात एखादा गरीब जर उपचारासाठी आला त्यांच्याकडुन आपल्या सेवेचे पैसे न घेता उलट त्यास उतार खर्चासाठी पैसे देणे अशी अविरत सेवा त्यांनी सुरुवाती पासून ते आजतागायत कोणत्याही प्रकारची सुट्टी न घेता सुरू ठेवली.
सदर वैद्यकीय सेवा देत त्यांनी कोरोना विषययीची अवास्तव भिती दूर करण्यासाठीचा जनतेत वापलेले तंत्र याचा सकारात्मक परिणाम येथील पंचक्रोशीतील जनतेसाठी झाला. या त्यांच्या कार्याची नोंद साई सेवा मंडळ उर्णोली ,पेण मधील सदस्यांनी घेऊन नवरात्री उत्सवात भव्य मंदिराच्या प्रांगणात महिला भगिनींच्या हस्ते
शंभर दिव्यांनी त्यांचे औक्षण करून डॉ. संजय ठाकुर यांना कोरोना योद्धा सन्मान देऊन तसेच त्यांच्या सौभाग्यवती डॉ.रुपाली. संजय ठाकुर यांना कोरोना योद्धा सौभाग्यवती सन्मान देऊन गौरविण्यात आले.
सन्मान म्हणून शिवराज्याभिषेक भव्य प्रतिमा सन्मान पत्र, सन्मान चिन्ह शाल श्रीफळ व डॉ रुपाली संजय ठाकुर यांना साडी भेट देऊन गौरविण्यात आले सदर सत्कार सोहळा पाहण्यासाठी कोरोनाचे नियम पाळून मोठ्या प्रमाणात उर्णोली गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
या सोहळ्यासाठी श्री साई सेवा मंडळातील सदस्य विलास पाटील, जगदीश पाटील, रमेश पाटील , दयानंद म्हात्रे, ज्ञानेश्वर पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे , दिलिप म्हात्रे, बाळाराम म्हात्रे. मिलिंद पाटील, सुनिल पाटील, भास्कर पाटील , केशव पाटील,
निवृत्ती म्हात्रे, उमेश पाटील प्रतिक पाटील, विनेश पाटील, दर्शन पाटील , संतोष पेरवी , पुंडलिक पाटील, आतेश पाटील ,
यांनी अपार मेहनत घेतल्या बद्दल मंडळाच्या वतीने सत्कार मूर्ती डॉ. संजय ठाकुर व डॉ. रुपाली ठाकुर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.








Be First to Comment