Press "Enter" to skip to content

उच्च रक्तदाब व मधुमेह असलेल्या नागरिकांनी उपवास टाळावा

कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांनी उपवास न करण्याचे  वैद्यकीय क्षेत्रातून आवाहन

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

सध्या सण उत्सवाचे दिवस सुरु असून गेली दीड वर्षे बंद असलेली सर्वधर्मीय धार्मिक स्थळे उघडली असून अनेक नागरिक राज्य  सरकारने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करून धार्मिक स्थळांना भेट देत आहेत. भारतामध्ये उपवास , व्रत वॆकल्ये यांला खूप महत्व आहे.मुस्लिम बांधवा रमजान महिन्यात रोजा धरतात. त्याचप्रमाणे हिंदू बांधव व भगिनी नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करतात. परंतु गेली दीड वर्ष आपण कोरोना महामारीशी लढत असून कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांनी उपवास न करण्याचे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व वैद्यकीय चिकित्सक डॉ.अभय गायकवाड  म्हणाले, ” कोरोना झालेल्या नागरिकांची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते यातच जर उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास असेल तर शारिरीक यंत्रणेवर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. उपवासा दरम्यान अनेक  नागरिक आठ ते दहा तास उपाशी राहतात, त्यानंतर खूप भूक लागते त्यावेळी जास्त खाणे खाल्ले जाते त्यावेळी अंतस्त्रावी ग्रंथीतून इन्सुलिनचा अत्याधिक स्त्राव होतो त्यामुळे शरीरातजास्त प्रमाणात कॅलरी तयार होते व वजन वाढते, काहीवेळी लोक दुसऱ्या दिवशी उपवास असेल तर आदल्या दिवशी जास्त खातात त्यामुळे सुद्धा वजन वाढते.

खाई लोक उपवासाच्या दिवशी फक्त चहा कॉफीचे सेवन करता त्यामुळे शरीरात आम्ल वाढते व पोटाचं विकार सुरु होतात. साध्य संपूर्ण जग आरोग्य संक्रमणातून जात असून कोरोनाची महामारी पूर्णपणे नष्ट झालेली नाही. कोणताही विषाणू हा सहजपणे नष्ट होत नाही . पोलियोच्या विषाणूंसोबत आपण ७० वर्षाहून अधिक काळ लढा देत आहोत, म्हणूच आपल्या आयुष्यात काही बदल करावयाचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. उपवास करणे म्हणजे उपोषण नाही. स्वत: उपाशी राहण्याऐवजी दिवसा कमी प्रमाणात अन्न खा.

उपवासाला लागणारे पदार्थ खा, पण उपाशी राहू नका.उपवास करताना, कोणीही दिवसातून एकदाच खाण्याचा किंवा दिवसभर न खाण्याचा नियम पाळता कामा नये. यामुळे आपल्याला मळमळ, उलट्या आणि ऍसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात.”

उपवास व हृदयविकार याविषयी बोलताना  नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, ” हृदयविकार असलेल्या नागरिकांनी उपवास करू नये गरज असेल तरच दिवसातून तीन ते चार वेळा तंतुमय पदार्थ खाऊन उपवास करावा. कोलेस्टेरॉल आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ वज्र्य करावेत. अगदी स्निग्धांशविरहित मध्ये थोडंसं कोलेस्टेरॉल असतं. संपृक्त स्निग्धांश जवळजवळ वर्ज्य करावेत.

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याच्या दृष्टीनं उपयुक्त असलेले कांदा, लसूण, गाजर, सोयाबीन, स्किम्ड मिल्क, दुधाचे दही, सफरचंद आहारात समाविष्ट करावा.  कच्चे पदार्थ शक्यतो जास्त खावे. कोबी, फ्लॉवर, गाजर, मुळा, कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, कोवळी भेंडी, पालक, मेथी, लेटय़ूस अशा भाज्या, मोडाची कडधान्ये, भिजवलेल्या डाळी, वेगवेगळी फळे भरपूर खावीत. हृदयविकार असलेल्या नागरिकांनी चहा, कॉफीचा अतिरेक टाळावा. आहारात तंतुमय पदार्थाचे प्रमाण पुष्कळ असावे.”

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.