एका फोन ने लसीकरण टीम आपल्या दारी–शिवसेनेची समाजसेवा आपल्या घरो-घरी
सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
महाराष्ट्र राज्यात कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक नागरिक बाधित झाले आहेत. शिवसैनिकांनी सर्वतोपरी मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही संकल्पना दिली आहे. या त्यांच्या संकल्पनेचा आदर करत उरण शहराच्या प्रत्येक विभागात/प्रभागात/वार्डात सर्व नागरिकांनासाठी शिवसेना उरण शहरच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर व शिवसेना गटनेते श्री गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत फिरता लसीकरण कार्यक्रम संपूर्ण उरण शहरात राबविण्यात येणार आहे.
यामध्ये कोविशिल्ड व कोवाक्सिन लसीचे पहिला व दुसरा डोस उपलब्ध करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी खाली दिलेल्या पदाधिकारी यांना फोन करून आपल्यासाठी घरपोच लसीकरणाचा लाभ घ्यावा विनोद म्हात्रे, शहरप्रमुख मो. नं.
98209 12618, अतुल ठाकूर, नगरसेवक
मो.नं . 99306 70728, गणेश पाटील, उपशहरप्रमुख मो. नं. 98330 01393, कैलास पाटील, उपशहरप्रमुख मो. नं. 84240 03094, नयन भोईर, युवासेना शहरप्रमुख मो. नं. 91677 87422 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उरण शहर शिवसेना शाखेतर्फे करण्यात आले आहे.








Be First to Comment