Press "Enter" to skip to content

उपसरपंचपदी केशव गायकर

भाताण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी केशव गायकर यांची बिनविरोध निवड

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

भाताण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रेश्मा नरेश भोईर यांनी पदाचा राजीनामा देताच रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. उपसरपंच पदासाठी केशव हिरु गायकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात कोणी उपसरपंच पदासाठी अर्ज न केल्याने गायकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच सुभाष भोईर व ग्रामसेविका रजनी माळी यांनी जाहीर केले.

भाताण ग्रामपंचायत कार्यालयात निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला.यावेळी पनवेल पंचायत समिती माजी उपसभापती वसंत काठावले उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच केशव गायकर यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी माजी उपसभापती वसंत काठावले यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्रामसेविका रजनी माळी, सरपंच सुभाष भोईर, मा.उपसरपंच मंदा ठाकुर, मा.उपसरपंच अस्मिता काठावले, माजी उपसरपंच रेश्मा भोईर ग्रामपंचायत सदस्य सुनिल सते, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक ठाकुर,अरुण पाटील, चंद्रकांत भोईर, युवानेते अनिल काठावले नथुराम पाटील,अनंत मुकादम आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.