Press "Enter" to skip to content

अष्टविनायक पतसंस्थेची सभा

नागोठणे येथील श्री अष्टविनायक पतसंस्थे ची 23 वि वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सिटी बेल | नागोठणे | याकूब सय्यद |

श्री अष्टविनायक ग्रामीण बिनशेती सहकार पतसंस्था मर्यादित नागोठणे ची सर्वसाधारण 23 वि सभा ठिकाण नागोठणे हॉटेल इंद्रप्रस्थ कॉन्फरन्स हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती.

त्यावेळी सर्वसाधारण सभेचे प्रमुख अतिथी नईम खान (शाखाधिकारी कोकण मर्चंट को-ऑपरेटिव्ह शाखा नागोठणे ) यांनी पतसंस्थेच्या 23 वी सर्वसाधारण सभेमध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी तसेच पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पत्रकार महेश पवार, श्यामकांत नेरपगार, याकूब सय्यद, राज वैशंपायन, नागोठणे मधील प्रथम महिला पत्रकार म्हणून श्वेता वैशंपायन ही कार्य करत असल्याबद्दल तसेच तनिष्का मंडल महिला नवनिर्वाचित अध्यक्ष सौ.शबाना मुल्ला या सर्वांचा श्री.अष्टविनायक ग्रामीण बिगर सह पतसंस्था नागोठणेचे चेअरमन विलास चौलकर यांच्या हस्ते या सर्वांना गौरवण्यात आले.

संस्थेचे चेअरमन विलास चौलकर यांनी सर्वसाधारण सभेत आपल्या संस्थेने 23 वर्षात केलेली प्रगती ही आपल्या संस्थेचे ऐकतेच बळ असल्याचेच कारण दाखवून संस्थेचे सर्व संस्था मंडळ कार्यकारिणीचे मोलाचे योगदान असल्याने या संस्थेत अनेक ठेवीदार खातेदार आहेत ही पतसंस्था यशाच्या शिखरावर पोहोचली असल्याचे अभिमान व आनंद मला व पतसंस्थाचे सर्व कार्यकारी मंडळ यांना आहे असे आपले भाषणात मनोगत व्यक्त करताना सांगितले.

श्री.अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकार पतसंस्था मर्यादित नागोठणे संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष जयराम मारुती पवार, चेअरमन माननीय विलास चौलकर व्हाईस चेअरमन महादेव सिंग परदेसी, सेक्रेटरी सौ आरती रोहिदास हातलोणकर, खजिनदार नामदेव चितळकर तसेच सर्व बँकेचे सदस्य व कर्मचारी मंडळी या सर्वसाधारण सभेत उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.