Press "Enter" to skip to content

उद्या महाराष्ट्र बंद !

११ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होण्याचे रायगड काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांचे आवाहन

सिटी बेल | पनवेल |

उत्तर प्रदेश लखीमपूर खिरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपच्या योगी सरकारकडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना तुरुंगात डांबून इंग्रज राजवटीचा परिचय भाजप सरकारने करून दिला.

या अत्याचारी भाजप सरकार विरोधात संपूर्ण देशभर आंदोलने सुरु आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील सोमवार दिनांक 11ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी पाठिंबा देत असून, रायगड जिल्ह्यातील सर्व व्यापारी,शेतकरी, कामगार (अत्यावशक सेवा वगळून ) यांनी या बंद मध्ये व्हावे असे आवाहन रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.