राही सामाजिक संस्था मुंबई यांच्याकडून घेरावाडीच्या सर्व कुटुंबांना जीवनावश्यक रेशन किट चे वाटप
सिटी बेल | आपटा |
जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या पाठपुरव्यानंतर राही सामाजिक संस्था मुंबई यांच्याकडून घेरावाडीच्या सर्व कुटुंबांना जीवनावश्यक रेशन किट चे वाटप आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंच निकिता भोईर यांच्या प्रमुख उस्थितीत करण्यात आले.



यावेळी राही संस्थेचे मार्गदर्शक राजेश जाधव, संस्थापक सदस्या वनिता कांबळे अर्चना ट्रस्ट चे सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत, गणपत पिरकड , संतोष पारधी, नामदेव पारधी तसेच घेरावाडीचे सर्व महिला पुरुष उपस्थित होते राही संस्था गेली अनेक वर्षे ठाणे ,पालघर,मुंबई नवी मुंबई अशा विविध भागात विशेसतः आदिवासी वस्तीमध्ये सामाजिक कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून ज्ञानेश्वर घरत यांनी पनवेल तालक्यातील आदिवासी भागात काम सुरू करावे अशी विनंती राही संस्थेला केली होती.

आज या संस्थेने पाहिले कार्य घेरावाडी पासून सुरू केले. येथील सर्व कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे प्रत्येकी पंचवीस कीलोचे रेशन किट चे वाटप केले. कोरोना काळात अशा प्रकारची मदत मिळाल्यामुळे येथील ग्रामस्थांनी व सरपंचांनी राही संस्थेचे मनापासुन आभार मानले आणि ज्ञानेश्वर घरत यांना देखील धन्यवाद दिले.










Be First to Comment