आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त रोहे तालुक्यात चित्रकला स्पर्धेचे आयोजन
सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
भारतभर जागरूकता अभियान व पोहोच कार्यक्रमातंर्गत आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त दि.११ आँक्टो. रोजी
चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
भारतभर जागरूकता अभियान व पोहोच कार्यक्रमातंर्गत राष्ट्रीय विधी प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व दिवाणी न्यायाधीश क स्तर रोहा तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती रोहा यांच्या वतीने दि.२ आँक्टो. ते १४ आँक्टो.या कालावधीत सदरील अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने अधिकार क्षेत्रातील रोहे तालुक्यातील कोएसो मेंहेंदळे हाय. रोहा,द.ग.तटकरे माध्य.विद्या.कोलाड, गु.रा.अग्रवाल हाय.नागोठणे व न्यू इंग्लिश स्कूल चणेरा या चार केंद्रावर इ.५ वी ते ७ वी व इ.८ वी ते १० वी या गटातील विद्यार्थ्यांकरिता आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी १. बालकामगार प्रतिबंध,२.बेटी बचाओ-बेटी पढाओ,३.बालकांचे अधिकार,४ स्त्री भ्रूण हत्या व ५.पर्यावरण संरक्षण आदी विषय ठेवण्यात आले आहेत. तर प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट तीन चित्रांना पारितोषिके व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तर याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ११ आँक्टो. रोजी स.९ वा.कोएसो मेंहेंदळे हाय. ते रोहा-अष्टमी नगर परिषदेपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत बेटी बचाओ-बेटी पढाओ या संकल्पनेवर विद्यार्थ्यांच्या रँलीचेही आयोजन करण्यात आले आहे.







Be First to Comment