प्रधानमंत्री अन्नसुरक्षा योजनेतंर्गत महिला बचत गटासाठी मोफत मार्गदर्शन व कार्यशाळा संपन्न
सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील दवकान्हे या गावी प्रप्रधानमंत्री अन्नसुरक्षा प्रक्रिया योजनेतंर्गत महिला बचत गटासाठी मोफत मार्गदर्शन व कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.
तालुका क्रुषी विभागातंर्गत व एक्सेल कंपनी धाटाव यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या या कार्यशाळेप्रसंगी येथील सरपंच वसंत भोईर,सदस्य दयाराम भोईर,
देवकान्हे कृषी सहाय्यिका सारीका दिघे, मंडळ कृषी अधिकारी एम.बी.करे,कृषी पर्यवेक्षक जे. एल. मढवी,कृषी सहाय्यक एन. जी. जामकर, एक्सेल इंडस्ट्रीचे कार्यक्रम समन्वयक सुशील रूलेकर, प्रसाद भोईर उपस्थित होते.

या कार्यशाळेत गावातील १५ महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यात आले. तर एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड मार्फत २६ मसाले तयार करण्यासाठी दोन दिवस मोफत प्रशिक्षण देण्यात आले.महिला स्वयंसिद्धीसाठी क्रुषी विभाग व एक्स्प्रेस इंडस्ट्रीज यांच्या वतीने संपन्न करण्यात आलेल्या या कार्यशाळेबद्धल सरपंच वसंत भोईर व सदस्य दयाराम भोईर यांनी आभार व्यक्त करून समाधान व्यक्त केले.








Be First to Comment