Press "Enter" to skip to content

जेएसडब्लुवर धडकणार शिवसैनिक

जेएसडब्लुवर १८ ऑक्टोबर ला रायगड जिल्ह्यातील हजारों शिवसैनिकांचा जन आंदोलन मोर्चा

जिल्हाध्यक्ष तथा आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली कंपनीवर धडक

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील वडखळ डोलवी परिसरात असणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीतील अनेक महत्त्वाच्या समस्यांच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख तथा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, महाड चे आमदार भरत गोगावले, उरणचे माजी आमदार मनोहर भोईर, माजी जिल्हा प्रमुख बबन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जनआंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मध्ये दिली.

यावेळी अधिक माहिती देताना संजय जांभळे यांनी सांगितले की, जेएसडब्ल्युु
कंपनीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तसेच येथील भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीयांची भरती केली आहे कंपनीमुळे या भागातील जमिनी ओसाड झाल्या असून नापीक झालेल्या आहेत याशिवाय एमआयडीसीच्या प्रस्थापित करीता शेतकऱ्यांच्या जमिनी ही जेएसडब्ल्यु कंपनी घेत आहे ते थांबले पाहिजे यामुळे अनेक समस्यां उद्धभवत असल्याने स्थानिकांच्या रोजगारासाठी माझा आवाज नेहमीच उठणारा असल्याचे सांगून कंपनीने आतापर्यंत अनेक ठेकेदारांना देशोधडीला लावले आहेत त्यामुळे आपण आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली येथील नागरिकांसाठी सातत्याने लढा उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.त्यामुळे येत्या १८ ऑक्टोबर रोजी जेएसडब्ल्यू कंपनीवर रायगड जिल्ह्यातील हजारों शिवसैनिकांचा जनआंदोलन मोर्चा दोन्ही गेट समोर होणार असल्याचे जांभळे यावेळी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.