द्रोणाचार्य करियर अकॅडमी तर्फे शिहू येथे मार्गदर्शन शिबीर
सिटी बेल | मंजुळा म्हात्रे | नागोठणे |
द्रोणाचार्य करियर अकॅडमी तर्फे पोलिस भरती तसेच इतर भरती विषयी पूर्व मार्गदर्शन शिबिर बहिरेश्वर मंदिर शिहू येथे प्रतिक साळुंखे ( नॅशनल लेव्हल लॉन्ग जम्प सिल्वर मॅडलीस ) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थांना मार्गदर्शन पर बोलताना प्रतिक साळुंखे यांनी सांगितलं की ग्रामीण भागातील मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही ते मी त्यांना योग्य पद्धतीने देऊन तीन महिन्यात विदयार्थ्यांची पुर्ण मैदानी चाचणी ची तयारी करून घेण्याचे प्रतिपादन त्यांनी या वेळी केलं.
या मार्गदर्शन शिबिराला उपस्थित परमार्थ ग्रुप चे शुभंम मोकल, कृतेश खाडे, राजेश गदमले, शिहू विभागातील बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.








Be First to Comment