खा.तटकरे यांनी फेडला कलमजाईदेवीचा ना.अदिती तटकरे यांनी केलेला नवस
ग्रामस्थांनी पुन्हा केला खासदारकीसोबतच केंद्रीय मंत्रीपदासाठी नवस
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
तालुक्यातील तुर्भे पंचक्रोशीतील जागृत देवस्थान श्रीकलमजाई देवीच्या मंदिरातील जत्रेवेळी तत्कालीन राजिप अध्यक्षा आणि विद्यमान पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी त्यांचे वडील आणि लोकसभा निवडणुकीतील उमेदवार सुनील तटकरे प्रचारादरम्यान केलेला नवस फेडण्यासाठी रविवारी सकाळी खा.तटकरे यांनी श्रीकलमजाई मंदिरामध्ये जाऊन नवसपूर्ती केली. मात्र, यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे खा.तटकरे यांनी पुढीलवेळी केंद्रीय मंत्री म्हणून या मंदिरात पुन्हा यावे, असा नवस करून खा.तटकरे यांच्याप्रती त्यांचे प्रेम व्यक्त केले.
पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द आणि वझरवाडी गावांच्या सीमावर्ती भागात देवी कलमजाई मंदिर असून देवी कलमजाई, रवळनाथ, कुंभळजादेवी, देवीळमाळ, काळकाई आदी पंचायतन आहे तर समोरच वझरवाडीची गावपांढरदेखील आहे. याठिकाणी खा.सुनील तटकरे यांच्यासोबत सहदेव उतेकर, मधुकर उतेकर, सुदास मोरे, गोविंद उतेकर, मंगेश उतेकर, दत्ताराम उतेकर, वामन उतेकर, नामदेव उतेकर, कृष्णा उतेकर, नामदेव उतेकर, माजी सरपंच साक्षी मंगेश उतेकर, भगवान जाधव, सुर्यकांत जाधव, महादेव जाधव, बळीराम चव्हाण, अर्जून जाधव, नवनाथ शिंदे, श्रीहास शिंदे, शांताराम जाधव, शिवाजी जाधव, वसंत जाधव, सखाराम चव्हाण, शिवराम उतेकर, राजाराम उतेकर, सुंदर उतेकर, यशवंत उतेकर, ज्ञानदेव उतेकर, आत्माराम उतेकर आदी ग्रामस्थ नवसपूर्तीसाठी उपस्थित होते. यावेळी मधुकर उतेकर यांनी खा.तटकरे यांना ब्रिटीशकालीन पहिल्या महायुध्दातील शहिद स्तंभाच्या परिसराचे सुशोभिकरण करण्याचे निवेदन दिले.
याप्रसंगी खा.सुनील तटकरे यांनी कोरोना परिस्थितीमध्ये नवस फेडण्यास विलंब झाला असल्याने ग्रामस्थांची क्षमा मागून ग्रामस्थांचा विचार झाल्यास आपण स्वत: आणि पालकमंत्री ना.अदिती तटकरे या मंदिराच्या जिर्णोध्दाराची संधी दिल्यास सेवा करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली. या परिसरातील लोकांनी दिलेल्या सहकार्यामुळे खासदार झाल्याबद्दल ॠण मानत असून येथील सेवेची संधीही मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुदास मोरे यांनी केले.
रयतच्या न्यू इंग्लिश स्कूल तुर्भेला भेट
पोलादपूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल तुर्भेच्या इमारतीला खा.सुनील तटकरे यांनी भेट देऊन नवीन इमारत उभारण्याकामी रयतच्या विद्यामंदिर पोलादपूर इमारतीप्रमाणे सहकार्य करावे, अशी आग्रही भूमिका सुदास मोरे, नाना गुरूजी, शिवराम उतेकर, सिताराम तथा नाना जाधव, कृष्णा उतेकर, सहदेव उतेकर, केशव खेडेकर, नरेश शेलार आदींनी घेतल्यामुळे खा.तटकरे यांनी या इमारतीची पाहणी केली.
यावेळी ग्रामस्थांनी शाळेच्या जमिनीचा सातबारा ग्रामस्थांच्या नावावरच राहिल अशापध्दतीने नव्या इमारतीची उभारणी करण्यासंदर्भात खा.सुनील तटकरे यांना साकडे घातले.
खा.तटकरे यांनी यावेळी शिक्षणप्रेमी ग्रामस्थांसमोर बोलताना, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माननीय राष्ट्रीय नेते शरदश्चंद्र पवार असल्याने आपण या माध्यमिक शाळेच्या इमारतीबाबत काही विशेष सहकार्य करण्यासाठी निश्चितच महत्वाची भूमिका बजावू, असा विश्वास व्यक्त केला. या दौऱ्यामध्ये खा.तटकरे यांच्यासमवेत महाड विधानसभा अध्यक्ष बाबू खानविलकर, जिल्हा महिला संघटक प्रतिमा अभंग जाधव, सेवादल जिल्हा अध्यक्ष वाय.सी.जाधव, सरचिटणीस सुहास मोरे, महमद मुजावर, भाई पाटेकर, मुजम्मील तांबे, अनिलकुमार भोसले तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment